Sunday, January 22, 2017

नो इन्हेस्टमेंट.. ओन्ली अनाऊंसमेंट.


चेंबूर स्टेशन.वेळ-रात्रीची..

10 बजकर 20 मिनीटका पनवेल गाडी 1 मिनीट मे आएगा...अस काहीतरी वेगळ्याच टोनमधे ऐकू आल.माणस इकडेतिकडे बघायला लागली...पुन्हा दूसरी ट्रेन यायच्याआधी ही अशीच अनाऊसमेंट ऐकायला मिळाली. आपली ट्रेन यायला 9 मिनिट होती..म्हटल जवळ जाउन बघाव नक्की काय भानगड आहे....आवाजाच्या दिशेन गेल्यावर हा वयस्कर माणूस दिसला...मळलेला शर्ट, निळी लूंगी...खुरटलेली दाढी..अशा पेहरावात..

लोकांना ट्रेनचे ठिकाण आणि वेळ सांगण ही या माणसाची खुबी..मोबादल्यात लोक काही पैसे हातावर ठेवतात. मग याला भिकारी तरी कस म्हणणार?....यांच नाव स्वामी...दिवसभर गोवंडी स्टेशनला असतात आणि रात्री चेंबुर...त्याच झालय अस की चेंबुर स्टेशनातल अनाऊंसमेंट करणार मशिन केव्हाचच बंद पडलय. हेच टायमिंग स्वामींनी साधलय आणि चेंबुर स्थानकातल एम-इंडिकेटर बनलेयत. म्हंजे कस आहे ना इंडिकेटरचा टायमिंगपण झक मारतय बघा स्वामींसमोर...स्वामींशी बोलण्याच्या नादात एक ट्रेन गेली..दुसरी ट्रेन दोन मिनीटात येईल हे पण स्वामींनीच सांगितल...बिनाभांडवलाचा स्टार्टअप इथून सूरू झालाय...नो इन्वेस्टमेंट..ओन्ली अनाऊंसमेंट..
feeling नो इन्हेस्टमेंट.. ओन्ली अनाऊंसमेंट.

Saturday, January 21, 2017

वाढदिवसाला पत्र

रविण,

तुला आधीच सांगतो... आपल्या खासमखास मित्राने आपल्या वाढदिवसाला पत्र लिहिणं हे जितकं भारी बिरी असतं ना... तितकंच डेंजरसही असतं. म्हणजे बरेचसे ड्राफ्टमधले मेसेजेसे एकाएकी सेंड होण्यासारखं डेंजरस असतं हे. म्हणूनच जरा हातचं राखूनच लिहिणारए. नाहीतर तुला माहितीए. मी बाजार उठवण्यात पटाईत आहे.
तर असो... ज्यासाठी हे पत्र आहे, ते आधी करु. हॅप्पी बर्थ डे भाई. आता यंदा गेल्यावर्षीसारखा तुझा वाढदिवस साजरा करता येईल की नाही माहित नाही. किंबहुना तसा वाढदिवस पुढल्या काही वर्षातही साजरा करता येईल की नाही, डोण्ट क्नो. तो भारीच झाला होता रे. तुला ऑफिसमधनं उचललं काय... केक म्हणून आणलेला तो कलिंगड काय... कलिंग़डावर त्या मेणबत्त्या काय... त्या विझवणारा मरीन ड्राईव्हचा वारा काय... कलिंगडरुपी केक कापण्यासाठी आणलेला चाकू काय... च्यायला तुझा वाढदिवस तर त्या पाटलाच्या प्रिन्सपेक्षाही जबरा झाला होता.. हाहाहा... आवरा आवरा.. पण कितीही जबरा असला तरी त्यारात्रीच्या सेलिब्रेशनचा उत्तरार्ध इथे लिहायला नको. तो वाचून पराग सावंत रत्नागिरीतही लोळेल याची खात्रीए मला. तर आता थोडं तुझी हवा करणारं लिहायला हवंय... म्हणजे चांगलं चांगलं...

पण त्यासाठी आपण थोडं एमड़ीच्या पायऱ्यांच्या पाया पडून... गावकरला सलाम ठोकून कॉलेजात शिरायला हवंय. चल थोडा नॉस्टॅल्जिया अनुभवू. तू मला पहिल्यांदा भेटलास तो ११वीत. आपल्या वर्गात तेव्हा ही ढिगभर पोरं होती. त्यातून एखाद्याशी मैत्री होणं अशक्यच. मला वर्गातला तू अजूनही आठवतोयस.. साधारण लाल... अबोली... आकाशी रंगाचे उभ्या रेगारेगांचे तुझे शर्ट असायचे. उंची पहिल्या बाकावर बसायला भाग पाडेल इतकीच. चमकणारं... स्टीलचं मनगटाला जड झालेलं घड्याळ. खोडरबर सारखा दिसणारा तुझा तो टाटाचा मोबाईल. टाटाच ना? की रिलायन्स? सोड. हां आणि आठवतेय ती तू आजतागायत मिरवलेली खळी. आपल्या खळीवर खूप पोरी फिदा आहेत असं तुला तेव्हाही वाटायचं आताही वाटतं... तुला सांगतो गैरसमज घेऊन जगण्यातच खरी मजा असते रे. :P
ही तुझी मला झालेली नुसतीच एक जुजबी ओळख. वर्गातला एक मुलगा. ज्याचं नाव, आडनावही फारसं लक्षात नाही. आणि याचीही कल्पना नाही की पुढे तीन वर्ष हेच नाव तुझ्या नावाला चिटकून जाणारए. होय च्यायला. आपल्या नावांचे किस्से खूपच भारीएत. म्हणजे इतके की माझ्याकडे कुठल्याशा स्पर्धेतलं एक सर्टिफिकेट आहे. ज्यात नाव लिहिलं गेलंय. गुरुप्रसाद दाभोळकर. आता यावर हसावं की रडावं हे मला तेव्हाही कळलं नव्हतं आणि आजही कळत नाही. पण ते दिवस आठवले की जाम भारी वाटतं रे. म्हणजे मला माझी वेगळी ओळख नव्हती की तुला तुझी. सगळेच आपल्याला गुरु- प्रविण म्हणायचे. तेव्हा ते विचित्र वाटायचं. आता त्यातली गंमत कळतेय. मला तर एक ठळक आठवतंय तुझ्या वाढदिवसाचा एक मेसेज माझ्या फोनवरही आला होता एका वर्षी.

मी आज जे काही करतोय, जिथे कुठे नोकरी करतोय. त्यात तुझा वाटा दिशादर्शकाचा आहे. यात शंकाच नाहीये. म्हणजे अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायचीच तर... तू भरलास म्हणून मीही भरलेला एनएसएसचा फॉर्म आठवतोय. ज्या एका फॉर्मने खरंतर आपलं कॉलेज लाईफ इतरांपेक्षा वेगळ्या वळणावर नेलं. मग पुढे यातूनच स्पर्धांकडे वळलो... स्पर्धांतून लिखाणाकडे... लिखाणातून पत्रकारितेकडे. आपण कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून प्रहारला जायचो तिथेही कसं लिहायचं काय लिहायचं याचे ठोकताळे तूच समजावलेस. सहा महिने काहीच न लिहणारा मी सहा महिन्यानंतर लिहू लागलो ते तुझे छापून आलेले काही आर्टिकल वाचूनच. यात काहीच अतिशयोक्ती नाही. की तुझी लाल करण्याचा प्रयत्न नाही.
पुढे सामनात तू लिहू लागलास... तिकडेही मला घेऊन गेलास. त्यानंतर पुढे मी इलेक्ट्रोनिक मीडियात शिरलो आणि लिखाणाशी नाळच तुटली. अशातही नंतरनंतर ब्लॉग वगैरेचं खूळ तूच डोक्यात भरलेलंस. तेव्हा कुठे बंद केलेला ब्लॉग मी पुन्हा सुरु केला. खरंतर हे पत्र लिहिणारा मी आहे म्हणून हे सगळं तू माझ्यासाठी... “असं केलंस तसं केलंस“ येतंय. पण मला माहितीए. असं म्हणणारा मी एकटा नाहीये. असे किमान शंभर तरी असतील. जे हे वाचून तू त्यांच्यासाठी जे जे काही केलयंस ते आठवतील. तुझी समाजसेवा तुझ्या चाळीपासून सुरु होऊन... कॉलेज... एनएसएस... ते पार आदिवासी पाड्यापर्यंत तुला घेऊन गेली. जेव्हा इतर पोरांना या समाजसेवेतून मार्क मिळवायचे होते तेव्हा तू यातून माणसं मिळवत गेलास. मला याचं तेव्हाही काळजी वजा अप्रूप होतं. आजही आहे. पुढेही राहिल.

तू पत्रकारितेत आता स्थिरावलाय.. रमलायस... मुरलायस हे पाहून बरं वाटतंय. कंपनीच्या प्रेमात न पडता, मिळणाऱ्या पगाराच्या प्रेमात पडून नोकऱ्या बदलतोयस हेही मस्त वाटतंय. पत्रकार होण्यासाठी लागणारे गुण पहिल्यापासूनच माझ्यापेक्षा तुझ्यात अधिक होते, आहेत. यावर मी अजूनही ठामए. त्यामुळे तू जमेल तितका काळ हेच करत राहावंस असं मनापासून वाटतंय. बाकी तू जे काही फॅण्ड्री बिण्ड्री... एक करंजी मोलाची वगैरे असं काही करत असतोस ते मला कधीच आवडलं नाही. तरीही तुला यात आनंद मिळतो असं तुझं मत आहे. म्हणून ठिकए.
आपण आपल्याला किती ओळखतो... शब्दांनी किती जवळून मांडू शकतोय याची पडताळणी करण्याचा प्रयत्न म्हणजे हे पत्र. बाकी याचं काहीच महत्व नाहीये माझ्या लेखी. मी मागे एकदा एका मैत्रिणाला पत्र लिहिलेलं ते तुझ्याकडून प्रूफ रिड करुन घेतलेलं. आता हे कुणाकडे देत नाहीये. थेट तुलाच पाठवतोय. तुझं तूच करुन घे. बाकी एकाही मुलीचा उल्लेख पत्रात न केल्याने तू माझा आयुष्यभर ऋणी राहशील यात शंका नाही. हे मी सुधारल्याचं लक्षण समज. अथवा दिखावा. बाय द वे पुन्हा एकदा हॅप्पी बर्थ डे. पार्टी नको देऊस. खूप खर्च होतो रे. आणि मित्रांवर काय खर्च करायचा? मित्र कोण असातात रे... मित्र बित्र सगळं झूट असतं तुला सांगतो... बाकी तुझी इच्छा रे आणि काय?
खाली एक कविता टाकतोय.. ती तुझ्यासाठीच आहे. नावावर करून घे.
मैत्री म्हणजे ग्लासामधली शराब मित्रा
मुखी उतरता होतो अपुला नवाब मित्रा
सुटाबुटाची दुनिया असते किती दिवाणी
लंगोटीही कमी न करते रुबाब मित्रा
मनगटावरी घाई म्हणते पळापळा रे
घड्याळ करुनी घेऊ थोडे खराब मित्रा
वाचलीत मी चेह-यावरची दुःखद पाने
किती घातले जरी तू तेव्हा नकाब मित्रा
- Guruprasad

Happy Birthday Pravin...

Happy Birthday Pravin...

आज तुझा बड्डे बिड्डे...(थोड तुझंच copy केलाय ) पण छोटासा प्रयत्न … काही चुकल तर माफी असावी

Actually तसं खूप लिहावसं वाटतंय (n त्यात पण चांगल बोलाव लागणार) पण काय होतंय ना सुसंगता जुळत नाहीय वाक्यांमधली कुठून सुरुवात करू तेच कळत नाही (since you are पत्रकार तर तुला हे खूप ओभड-धोबड वाटू शकतंय)

विद्यार्थी विकास क्लास मध्ये आपली ओळख झाली तेव्हा आपण 7th ला होतो. आपल्या मैत्रीला आता जवळ जवळ 13 वर्ष झाली. निस्वार्थ मैत्री म्हणजे काय हे कोणी तुझ्याकडून शिकाव Pravin. मैत्री ही कोणत्या फायद्यासाठी म्हणून नसते हे मी तुझ्यामुळे शिकलो. N म्हणूनच तुझा मित्रवर्ग खूप मोठा आहे n सगळ्यांनाच तू आपलासा वाटतोस.
जस तू माझ्यासाठी म्हणालेलास की मी तुझी Bank आहे जिथे तू तुझ्या आठवणी Deposit करून ठेवू शकतोस तसाच तू सुद्धा माझ्यासाठी काही वेगळा नाहीस. माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तुला माहित असते infact बऱ्याचदा तू त्याचा part पण असतोस. तुझ सगळ्यात आवडलेलं वाक्य ह्यावेळी जे आपल्या बोलण्यात बऱ्याचदा आलाय “आपण फक्त आठवणी जमवायच्या म्हणजे म्हातारपणात नातवंडाना सांगायला काहीतरी असेल ”
As आपण almost रोज रात्री भेटायचो (गेल्या काही महिन्यात ह्यात खंड पडलाय तुझ्या job मुळे n माझ्या ahhhh… aso) दिवसभरात घडलेली अगदी प्रत्येक गोष्ट एकमेकांबरोबर share करायची n मगच good night म्हणत झोपायला जायचं हा रोजचा पायंडा. बऱ्याचदा ह्यामुळे वेळेकडे लक्ष पण नसायचं. (When you are with your best friend वेळ कधी निघून जातो कळतंच नाही). रात्रीच्या बोलण्यात अगदी "त्या" विषयांबरोबर future मध्ये काय करायचं ह्याबद्दल सुद्धा खूप बोलन होत. माझी विचार करण्याची पद्धत म्हणजे एक घाव दोन तुकडे त्यामुळे बऱ्याचदा कोणताही decision घेताना तुला विचारण महत्वाच कारण तू मला नाण्याच्या दोन्ही बाजू नीट समजावून सांगतोस त्यामुळे decision घेण खूप सोप होत मला.
कुठल्याही प्रोब्लेम मध्ये अडकल्यावर सगळ्यात पहिलं नाव जे डोक्यात येत ते म्हणजे Pravin Dabholkar. “A frnd who is just call away”. n एकदा का तुला प्रोब्लेम सांगितला की त्याच solution मिळणार हे नक्की .
तुझ्यामुळे मी n Omkar जास्त जवळ आलो. एकमेकांबरोबर मित्रासारखे राहू लागलो तुझ्यामुळेच आमच्या दोघांमधल नात जास्त घट्ट झाल ह्यासाठी मला तुला खूप मनापासून Thank you म्हणावस वाटत. घरामध्ये तर आई ला मी n ओमकार अगदी हक्काने सांगतो प्रविण हा आमचा भाऊ आहे.
तुझी लिखाणाची n वाचनाची आवड पाहून मला तुझ खूप कौतुक वाटत. तुझा पत्रकार म्हणून चालू असलेला प्रवास दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो हीच तुला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा . My best wishes are always there with u.

सकाळी फोन आला..आपले कारंडे सर आपल्यात नाहीएत..विश्वास तर अजूनही बसत नाहीए.. बातमी खोटी असू शकते. कोणाचा गैरसमज..पण नाही बातम्यांमध्ये दाखवताय मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पनवेलजवळ अपघात.17 जण दगावले...मृतांची यादी वाँट्सअपवर आली. सरांच नाव दिसतय.डाँ. अविनाश कारंडे (39)..एका अपघाताने खूप कुटूंब उध्वस्त झालीएत.त्यात सरसुद्धा....सांगायच कोणाला??..सांत्वन कोणाच करायच..आपला एम.डी. काँलेजचाच तर खुप मोठा परीवार आहे. खूप मोठ न भरून निघणार नुकसान झालय..."सर...आमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये कोण आजारी आहे..कोणाला रक्ताची गरज..सर्व गोष्टी सर्वात आधी तुम्हाला समजतात नंतर आमच्या पर्यंत पोहोचतात..समाजसेवा काय असते..सर तुम्ही शिकवलात..आपण सर्वांनी मिळून खूप स्वप्न बघितलेयत सर..तूमच्याच मार्गदर्शनातून बदलापूरच्या पाड्यातल काम गेली 4-5 वर्ष व्यवस्थित सुरू आहे..आपली स्वप्नपूर्तीची मूल देखील चांगली शिकतायत..आपल्या अँक्टीवीटी जबरदस्त चालल्यायत..माध्यमसुद्धा एम.डी काँलेजची दखल घेऊ लागलीएत...आपले सिनिअर विद्यार्थीही एकत्र राहून पाड्यात जाऊन काम करतायत..तूम्हाला तर प्रत्येकाबद्दल नावानिशी माहिती आहे... सर्व छान चाललेल सर..अगदी तूम्हाला पाहिजे तसच..आणि हे अस अचानक...सुन्न झालय सर्व.." ...भावपूर्ण श्रद्धांजली..

गुंड..तूझ्यावर पोस्ट टाकायला आज निमित्त भेटल बघ..आपला करीरोडचा जूना फोटो किती महिने मोबाइलमध्येच राहीलाय..तू पण जपून ठेवलायस आज दाखवलास..असो..आपण खूप कमी भेटतो..पण जेव्हा भेटतो तेव्हा शिवाजी महाराज आणि अफजलखानाची भेट कशी झाली असेल तो इतिहास मला नेहमी आठवतो..असो..

पण तू भेटल्यावर तूला खूप बोलायच असत..तूझ्या मनात खूप काही साठलेल असत...खूप इमोशनल झालेला असतोस यार..तू आहेसच तसा..तूला कोणी समजून घेत नाहीए ही तूझी नेहमीची तक्रार..पण वेळ पण बघत जा यार कधी तरी..असो...आजपण जिथे लव यू चा मेसेज यायला हवा होता तिथे गाँड ब्लेस यू चा मेसेज दाखवत तू रडलास..वेडा आहेस रे तू...विनाकारण इमोशनल होतोस...तू बाईक घेतलीस जिचा आपण शिद्धत नाव ठेवून बारसा केलाय..शिद्धतच्या रूपाने तूला तूझ प्रेम मिळाल असेल..स्वत:च्या पोटासारख तीच्याकडे दुर्लक्ष नको करू..
वरळी सी फेसला आलेल्या सर्वांनी तूला बड्डेच्या शुभेच्छा दिल्या, गर्दी केली...केक खाल्ला...तू विचारत होतासना एवढी गर्दी तू कुठून आणलीस..अरे ती माणसं येतच नव्हती..त्यांना सांगितल या मूलाच जगात कोणी नाहीए..आम्हाला बड्डे करायचाय..मग ते सर्व एकमेकांना घेवून आले..तूला माहीतेय मला खोट बोलायला आवडत नाही पण तूझ्यासाठी कराव लागल राव...पण तू खूष झालास ना..बसस. तूपण तूझी कविता ऐकवून सर्वांना खूष केलस..बाकीच्यांना किती समजल असेल शंका आहे पण तूझ्या चांगल्या कवितांपैकी हे एक..
..बाकी कोणी आयुष्यात आल्याने/ गेल्याने नशीब चांगल/ वाईट होत या अंधश्रद्धा आहेत रे...यातून तू काही ते समजून जाशिल..आपल नशिब आपल्या हातात आणि तूझ्या हातात तर आता शिद्धत आहे..असाच थेट पुढे जात रहा..कधीतरी स्वत:हून काँल करशीलच..आणि हो गर्दी गोळा करण्यासाठी फेसबुकवर दर्दी स्टेटस टाकलेच पाहीजेत अस काही नसतं..-p.

एक्स्प्रेस टू इम्प्रेस..


  • First Published :04-August-2016 : 16:43:35

 

तुमच्यासोबत असं होतंय का?? म्हणजे बघा ना छानशी पोस्ट लिहिलेय; पण फेसबुकवर अपलोड करू का नको असा विचार येतोय.. अ‍ॅक्टिंग करायची इच्छा होतेय; पण हिम्मत होत नाहीये... त्यावेळी छानसं गाणं सुचलेलं; पण विचार करण्यातच वेळ निघून गेला.. मोबाइलच्या टेक्स्ट बॉक्समध्ये काहीतरी लिहिलंय; पण पाठवू की नको धाकधूक होतंय.. असं काही?..
वेळ मिळत नाहीए .. लोक काय म्हणतील अशी कारण देतो आपण, की मरो.. बघू नंतर कधीतरी.. असं बोलून वेळ मारून नेतो आपण??.. 
एखाद्या प्रसंगावर, व्यक्तीवर, चालू घडामोंडीवर किती बोलायचं असतं आपल्याला.. किती लिहायचं असतं आपल्याला ‘पण’ लिहिण्याची वेळ येईपर्यंत कित्येक प्रसंग नजरेखालून भुर्रकन निघून गेलेले असतात किंवा कोणीतरी व्यक्त झालेला असतो.. मग पुन्हा त्यावर तेच तेच कसं बोलणार असा विचार करून आपण ती वेळदेखील मारून नेतो...
आठवा तो प्रसंग.. आपण कधीतरी आपल्याला पाहिजे तसे व्यक्त झालेलो असतो. खूप भरभरून बोललेलो असतो.. मन रित करून काहीतरी लिहिलेलं असतं.. मग कोणतरी हळूच येऊन सांगतं किती छान बोललात.. खूप छान लिहिलंय वगैरे.. आपल्याला खूप भारी वाटतं सगळं... सारखे सारखे आठवतात एखाद्याचे ते कौतुकाचे शब्द आणि तुम्ही एकटेच गालातल्या गालात हसत असता. पण ठरावीक तीच तीच गोष्ट आपण गिरवत राहतो आणि स्वत:चेच गालगुच्चे घेत असतो. यामध्ये सातत्य ठेवलं तर आयुष्यातल्या आनंदाचं गमक सापडू शकेल.. आपल्या या दाखवलेल्या हिम्मतीसोबत थोडी मेहनत तर आपल्याला घ्यावी लागेलच.
आपल्याला काय वाचायला आवडतं काय नाही आवडत, काय महत्त्वाचं आहे, काय अतिमहत्त्वाचं आहे याचं छानंसं वर्गीकरण करावं लागेल. कोणत्या वक्त्याची शैली कशी आहे या गोष्टींचा थोडाथोडका का होईना विचार करायला हवा... कोणत्या लेखकाचं लिखाण वाचताना स्फूरण चढलेलं असतं.. कोणीतरी वक्ता बोलत असतो; पण आपल्या अंगात रोमांच संचारलेला असतो.. या प्रत्येकाचा स्वत:चा एक चाहता वर्ग असतोच...
अजून किती दिवस बोलत रहायचं? लिहायचंय; पण हिम्मत होत नाही.. यावर एकच उपाय सरळ लिहत सुटायचं.. कोणी वाचो.. न वाचो.. वेळप्रसंग पाहून एखाद्या विषयावर मुद्देसूद बोलायचं.. कोणाला आवडोन आवडो... लोक काय म्हणतील.. याचा विचार आपण कशाला करायचा? थोडक्यात काय तर व्यक्त व्हायचं... एक्स्प्रेस टू इम्प्रेस हा लाईफचा फंडा आहे.. आपण आत्ताच असं मनाशी ठरवू कोणी कौतुक करो अथवा न करो मला स्वत:साठी व्यक्त व्हायचंय.. माझ्यातली घुसमट बाहेर काढायची आहे... आपल्या आतला अभिनेता, चित्रकार, फोटोग्राफर बाळंतपणासाठी धडपडतोय.. पोटातल्या पोटात लाथा मारतोय.. आपल्याला कळतही... पण आपण त्याला वाट मोकळी करून दिली पाहिजे.. वाढवलं पाहिजे... जोपासलं पाहिजे.. लिहायला, बोलायला, व्यक्त व्हायला सुरुवात केल्यानंतर आपल्यातले आपण जेव्हा सापडत जाऊ तो आनंद खूप वेगळा असेल...
अरे, विचार काय करताय?
कल करे सो आज.. और आज करे सो अभी..
 


- प्रवीण दाभोळकर 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)
 

मोती साबण

यावर्षीही दिवाळी आली आणि मोती साबणाची आठवण झाली. म्हणजे मला तर वाटत आधी मोती साबण बाजारात येत असेल मगच दिवाळी सुरू होते. म्हणजे ते आलार्म काका आणि अद्वैत दादरकर आमच्या चाळीत नाही राहायचे तरीही मोती साबणाच मला खूप कौतूक... हा #शांत, #टिकाऊ, #विश्वासू असा साबण वाटतो..सर्व साबणांमधले थोडे थोडके चांगले गुण त्याच्यात आहेत. दिवाळीची पहीली आंघोळ...अंगभर उटण लावायच आणि मोती साबण.. म्हणजे छान काँम्बिनेशन..#मूडफ्रेश..दिवाळीचा महीना पूर्ण जातो एका साबणात...नो चिपचिप- नो झिकझिक.

कारण डेटोल साबण डाँक्टरांनी औषध म्हणून लिहून दिलेला वाटतो. लहानपणी मैदानातून खेळून आल्यावर डेटोलने सर्व किटाणू मरतात-बिरतात अस वाटायच, #निव्वळअंधश्रद्धा . त्यापेक्षा आपला #आँल सिझन फेवरेट लाईफ बाँय बरा वाटतो. #कळकट मळकट कामाला बळकट .#स्वस्त-टिकाऊ, पिकनिकसोप, शेवटी शेवटी तो कोणत्याही साबणांमध्ये जाऊन मिक्स होऊन जातो#लाल करतो#संपून जातो. ते डव्ह, लक्स साबण जरा #नखरेवाल्या कँटगिरीतले वाटतात.लेस, कुरकुरेच्या पँकेटसारखे असतात, वापरायला घ्यायच्या आधीच संपत जातात. साबण हातात घ्यायच्याआधी फेसच हातात येतो,#नूसता धूर आणि हवा. सरडा , काही माणस रंग बदलतात तसा सिंथाँल, हमाम हे नुसते कव्हर बदलत असतात आतून कधी बदलले तर धन्यच.. म्हणजे एखाद्या #निगरगट्ट माणसासारखे...पिअर्स साबण मँलडी चाँकलेटसारखा वाटतो , #मँलोडी खावो खुद जान जावो असा. (खाऊन नाही बघितला कधी..;) )..हा पण मला कधी कधी मोती साबणाची आठवण करून देतो. (पतांजली साबण वापरायचाय अजून #स्वदेशी, #साँरीरामदेवबाबा)पण तरीही या सर्वात मोती साबणाची सर कोणाला नाही. दिवाळी आपण वर्षभर साजरी नाही करत तसाच हा मोती..#दिवाळीसोबत येतो आणि दिवाळी सोबत जातो
#लेटपोस्ट