नो इन्हेस्टमेंट.. ओन्ली अनाऊंसमेंट.
चेंबूर स्टेशन.वेळ-रात्रीची..
10 बजकर 20 मिनीटका पनवेल गाडी 1 मिनीट मे आएगा...अस काहीतरी वेगळ्याच
टोनमधे ऐकू आल.माणस इकडेतिकडे बघायला लागली...पुन्हा दूसरी ट्रेन
यायच्याआधी ही अशीच अनाऊसमेंट ऐकायला मिळाली. आपली ट्रेन यायला 9 मिनिट
होती..म्हटल जवळ जाउन बघाव नक्की काय भानगड आहे....आवाजाच्या दिशेन
गेल्यावर हा वयस्कर माणूस दिसला...मळलेला शर्ट, निळी लूंगी...खुरटलेली
दाढी..अशा पेहरावात..
लोकांना ट्रेनचे ठ
िकाण
आणि वेळ सांगण ही या माणसाची खुबी..मोबादल्यात लोक काही पैसे हातावर
ठेवतात. मग याला भिकारी तरी कस म्हणणार?....यांच नाव स्वामी...दिवसभर
गोवंडी स्टेशनला असतात आणि रात्री चेंबुर...त्याच झालय अस की चेंबुर
स्टेशनातल अनाऊंसमेंट करणार मशिन केव्हाचच बंद पडलय. हेच टायमिंग स्वामींनी
साधलय आणि चेंबुर स्थानकातल एम-इंडिकेटर बनलेयत. म्हंजे कस आहे ना
इंडिकेटरचा टायमिंगपण झक मारतय बघा स्वामींसमोर...स्वामींशी बोलण्याच्या
नादात एक ट्रेन गेली..दुसरी ट्रेन दोन मिनीटात येईल हे पण स्वामींनीच
सांगितल...बिनाभांडवलाचा स्टार्टअप इथून सूरू झालाय...नो
इन्वेस्टमेंट..ओन्ली अनाऊंसमेंट..
—
feeling नो इन्हेस्टमेंट.. ओन्ली अनाऊंसमेंट.
No comments:
Post a Comment